यावल । जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरीप हंगामासाठी शेतकर्यांना ’रूपी कार्ड’ स्वरूपात कर्ज दिले आहे. मात्र, या कर्जाचे स्वरुप कॅशलेससारखे असल्याने शेतकर्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. कारण तालुक्यातील बहुतांश एटीएम बंद, तर जे सुरू आहेत ते ’कॅश’लेस आहेत. परिणामी शेतकर्यांना पैसे मिळणे दुरापास्त झाले असून खरीपासाठी शेती तयार करण्यासह पेरणीसाठी पैसा आणावा कुठून? अशी अवस्था आहे. तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तब्बल 24 शाखा आहेत. या शाखांमधून दरवर्षी शेतकर्यांना खरीप हंगामासाठी कर्ज दिले जाते. या कर्जातून शेती तयार करणे, बि-बियाणे, खतांची खरेदी, मजुरी असा खर्च शेतकरी भागवतात. मात्र, यंदा जिल्हा बॅकेने शेतकर्यांना ’कॅशलेस’ स्वरुपात कर्ज देत रूपी कार्ड दिले. या कार्डचा वापर करून एटीएममधून पैसे काढावे, असे सांगितले. तंत्रज्ञानाच्यादृष्टीने बँकेची ही योग्य कृती असली तरी खरी अडचण बहुतांश एटीएममध्ये खडखडाट अडचण आहे.