समस्या न सुटल्यास हवा छोटो आंदोलनाचा इशारा
यावल- शिवसेना व युवा सेनेच्या शहर व तालुका पदाधिकार्यांनी एस.टी.महामंडळाच्या यावल आगार प्रमुखांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावल आगारास मंजूर दोन कोटींच्या निधीतून तत्काळ कामे सुरू करावीत, यावल येथून पुण्यासाठी शिवशाही बससेवा सीटींग व स्लिपर सुरू करणे, यावल येथून यावल-इंदौर- देवास व यावल-सुरत (दुपारी 1.30 ची) ही पूर्ववत आंतरराज्य बससेवा सुरू करावी, पुणे-यावल बससेवा पूर्वीच्या वेळेत करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. दोन महिन्यात मागण्या मंजूर न झाल्यास ‘हवा छोडो’ आंदोलन करण्याचा इशारा प्रसंगी देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी तालुकाप्रमुख कडू पाटील, शरद कोळी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, रवी सोनवणे, शहर उपप्रमुख संतोष धोबी, मोहसीन खान, युवा सेनेचे शहर अधिकारी सागर देवांग, सागर बोरसे, आदिवासी सेल शिवसेना तालुकाप्रमुख हुसैन तडवी, शाखाप्रमुख शकील पटेल, विक्की धोबी, अखिल तडवी, आसीफ तडवी, प्रदीप वानखेडे, विभागप्रमुख पप्पू जोशी, सिद्दीक कच्छी, हमीद पटेल, उज्वल कानडे, महेंद्र कोळी व इतर अनेक शिवसैनिक उपस्थित होते.