यावल एसटी आगारातील वाहक दिलीप नाले यांचे कर्तव्यावर असतांना ह्वदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुदैवी मृत्यु

यावल ( प्रतिनिधी ) येथील यावल आगारातील कार्यरत असलेले वाहक दिलीप नाले हे कर्तव्यावर असतांना अंजाळे भुसावळ दरम्यान एसटी बसमध्ये ह्वदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल एसटी आगारात सेवारत असलेले वरिष्ठ वाहक दिलीप वायुदेव नाले वय ५७ वर्ष राहणार देशमुख वाडा यावल हे दिनांक ७ सप्टेंबर रोजी नियमीतपणे आपले कर्तव्यावर असतांना ५, ३० वाजेच्या सुमारास यावल भुसावळ एसटी बसने प्रवासी सेवा करीत असतांना अचानक अंजाळे गावापासुन त्रास जाणवले त्यांना चक्कर येवुन बेशुद्ध झाल्याने त्यांना तात्काळ भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता,डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले . घडलेल्या घटनेचे वृत्त कळताच यावल आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह भुसावळ धाव घेत संपुर्ण घटनेची तपसीलवार माहीती घेतली . दितीप नाले हे मागील २६वर्षा पासुन यावलच्या एसटी आगारात वाहक या पदावर कार्यरत होते. आपल्या हस्तमुख स्वभावाने ते सर्वाचे परिचित होते . नाले यांच्या सेवानिवृत्तीला अवघ्या दोनच महीन्यांचा कालावधी राहीला असता त्यांचा मृत्यु झाला . त्यांच्या पश्चात कुटूंबात पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे . नाले यांच्या अशा आक्समिक निधनाने यावलच्या एसटी आगारात शोककळा पसरली आहे .