यावल- यावल पंचायत समितीच्या सभागृहात दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत पशूसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे सुनील नथ्थू भालेराव यांनी सावखेडासीम ग्रामपंचायतीच्या कारभाराची तक्रार केली होती तसेच गलथान कारभारास पंचायत समितीमधील काँग्रेसचे गटनेते शेखर पाटील यांचा वरद हस्त असल्याचा आरोप केल्यानंतर शेखर पाटील यांनी मारहाण व शिविगाळ केल्याचा आरोप भालेराव यांनी केला असून या प्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भालेराव यांनी निवेदनाद्वारे डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांच्याकडे केली आहे. दरम्यान, द्वेषभावनेतून तक्रार करण्यात आली असून नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला आहे. चौकशीनंतर सत्य समोर येईलच, असे गटनेता शेखर पाटील म्हणाले.