यावल कोर्टाकडून मुर्तीची तोडफोड करणार्‍यास आठ महिने साध्या कैदेची शिक्षा

0

यावल – भगवान गौतम बुध्दांच्या मुर्तीची तोडफोड करणार्‍यास येथील न्यायालयाने आठ महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीचेे नाव चव्हाणसिंग उर्फ सोन्या भिलालसिंग पावरा असे आहे. ‘अंडर ट्रायल’ आरोपीस तुरूंगात ठेवून हा खटला चालविण्यात आला. जामिनावर बाहेर आल्यावर हा आरोपी पसार झाला होता. सातपुड्यातील जामुनझिरा येथील एका बौध्द भिक्कुच्या कुटीत आरोपी चव्हाणसिंग उर्फ सोन्या पावरा दुपारी तीन वाजता गेला होता व कुटीत दोन हजार रूपये किंमतीच्या भगवान गौतम बुध्दाच्या मुर्त्यां ठेवल्या होत्या. आरोपीने कुटीत प्रवेश करीत मुर्त्यांची तोडफोड केली. या प्रकरणी यावल पोलिसात भीमराव वानखेडे भंतेजी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा योग्य तपास करून हवालदार पांडूरंग सपकाळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेे होते. दरम्यान जामिनावर सुटलेला आरोपीदेखील फरार झाला होता. तेव्हा हवालदार सपकाळे यांनी त्यास जंगलातुन शोेधून अटक केली होती. तेव्हापासुन आजवर आरोपी जळगाव जिल्हा कारागृहातच होता. या प्रकरणी यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायधीश डी. जी जगताप यांच्या समोर सादर करण्यात आलेल्या पुरावा व साक्षीदारांच्या साक्षीने आरोपी चव्हाणसिंग उर्फ सोन्या भिलालसिंग पावरा यास कलम 595 प्रमाणे आठ महिन्यांची साधी कैद तर कुटीत अनधिकृतपणे प्रवेश प्रकरणी आठ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. दोन्ही शिक्षा आरोपीस एकाच वेळी भोगायची आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणूून अ‍ॅड.जी.एम.बागुल, पैरवी अधिकारी प्रमोद लोणे, दुर्याधन साबळे व आलीम शेख यांनी काम पाहिले.