यावल । तालुका ज्युक्टो कार्यकारिणीची सभा 21 रोजी सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयात प्राचार्य एस.जे. बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये नूतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा. एस.आर. वाघ, सचिव प्रा. निवृत्ती वाणी, उपाध्यक्ष प्रा. एम.आर. खान, सहसचिव प्रा. अनिल इंगळे, कोषाध्यक्ष प्रा. डी.एन. मोरे, कार्याध्यक्ष प्रा. एस.एल. पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. श्रीकांत जोशी, महिला प्रतिनिधी प्रा. आर.व्ही. चोपडे, प्रा. फैजल खान, प्रा. एम.वाय. पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रसंगी जिल्हा सरचिटणीस प्रा. नंदन वडिकार, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र तायडे, कोषाध्यक्ष प्रा. सुधाकर गोसावी यांची उपस्थिती होती.
संघटनेतर्फे करण्यात आला सत्कार
नुतन निवड झालेल्या अध्यक्ष प्रा. एस.आर. वाघ, सचिव प्रा.वाणी, उपाध्यक्ष प्रा. खान यांसह इतर पदाधिकार्यांचा बैठकीदरम्यान सत्कार करण्यात आला. अध्यक्ष वाणी यांनी याप्रसंगी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की, सर्व सदस्यांनी आमच्यावर विश्वास दाखविल्याने या विश्वासाला तडा न जाऊ देता संघटनेच्या उत्कर्षासाठी व सर्व सदस्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचे सांगितले.