यावल तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची युवक काँग्रेसची मागणी

0

यावल- युवक काँग्रेसच्या वतीने यावल तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा अल्प झाले असून जिराईत व बागायती मुख्यतः केळी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. रब्बी हंगाम घेता येणे शेतकर्‍याां शक्य नाही. आजच शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या हतबल झालेले आहेत. शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेल असून शासन स्तरावरुन कोणतीही भरीव मदत शेतकर्‍यांना मिळालेली नसल्याने हे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे तसेच हे तत्काळ मदत द्यावी व शेतकर्‍यांचे सर्व कर्ज माफ करावी, शी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तर आंदोलन छेडण्याचा इशारा
सरकारने योग्य मदत केली नाही तर युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल व पुढील नुकसानीला सर्वस्वी सरकार जवाबदार राहील, असेही निवेदनात नमूद आहे. प्रसंगी युवक काँग्रेसचे, रावेर विधानसभा अध्यक्ष अलिम शेख, शहर काँग्रेस अध्यक्ष कदीर खान, शेख अझरोददीन, आरीफ खान, शेख निजाम, शेख जुनेद अरशद खान, रहेमान खाटिक आदी उपस्थित होते.