यावल तालुक्यातील अल्पवयीन तरुणीला पळवले : अज्ञाताविरोधात गुन्हा

यावल : तालुक्यातील एका गावातील आदिवासी क्षेत्रात राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्त फूस लावून पळवून नेले. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. शोधाशोध करून मुलगी न मिळाल्याने अखेर बुधवार, 17 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले
यावल तालुक्यातील एका आदिवासी भागात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. 11 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता सर्वजण जेवण करून घरात झोपले असता मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने 16 वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याचे 12 नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजता उघडकीला आले. मुलीचा परीसरात व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला मात्र ती आढळली नाही. अखेर बुधवार,17 नोव्हेंबर रोजी पीडीत मुलीच्या वडीलांनी यावल पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात विविध कलमान्वये यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.