यावल : तालुक्यातील एका गावातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्पवयीन मुलीला पळवले
यावल तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय मुलगी मावशी व मावसासह वास्तव्याला असून सोमवार, 17 जानेवारी रोजी दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान मुलगी शिवण क्लासला जावून येते, असे सांगून बाहेर पडली मात्र रात्री उशीरापर्यंत अल्पवयीन मुलगी घरी न आल्याने मुलीच्या वडीलांनी फैजपूर पोलिसात धाव घेतली. अज्ञात व्यक्तीविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहे.