यावल : सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने पोस्ट व्हायरल करणार्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक झाली, तिघांचा शोध सुरू आहे.
एका संशयीताला अटक
चिंचोली, ता.यावल येथे एका तरुणाने गायीला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेबाबत दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे कृत्य चौघांनी केल्याचा प्रकार यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या निदर्शनास आला. यानंतर यावल शहरातील चार तरुणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. यातील एका संशयीत राहुल धनराज कोळी याला अटक केली. इतर तीन संशयित हर्षवर्धन भोईटे, कमलेश शिर्के, मयूर महाजन (सर्व रा.यावल) यांचा शोध सुरू आहे. तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, राजेश वाढे करत आहे.