यावल : बोरावल रोडवरील एका शेतकर्याच्या शेतातील 1500 केळीची झाडे कापून अज्ञात भामट्याने नुकसान केल्याने त्याच्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल पोलिसात गुन्हा दाखल
शेतकरी भागवत सुपडू फालक (59, रा.महाजन गल्ली, यावल) यांनी चार वर्षांपूर्वी चितोडा, ता.यावल येथील छगन कडु चौधरी यांच्यासह इंदुबाई रवींद्र करांडे यांचे यावल शिवारातील भालशिव रस्त्यावरील शेती क्रमांक 126 ही शेतजमीन निमबटाईने करीत आले आहेत. या शेतामध्ये सध्या केळीचे पीक लावण्यात आले असून त्यात घड लागले आहेत मात्र 20 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता भागवत फालक हे त्यांचा मुलगा कल्पेश फालक सोबत गेले असता केळीवर फवारणी करीत असतांना त्यांना केळीच्या झाडावरील सुमारे 40 हजार रुपये किंमतीचे 1500 केळी झाडे अर्धवट कापलेल्या अवस्थेत दिसुन आले. फालक यांनी आपले सहकारी छगन चौधरी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून त्यांना घडलेल्या प्रकााराची माहिती दिली. फालक यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अज्ञात भामट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सहकारी पीक संरक्षक सोसायटीच्या वतीने संदीप डिंगबर फालक व रवींद्र रमेश धांडे यांच्या समक्ष केळी पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.