यावल नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी संचालकांविरूध्द प्रोसेस इश्यू

0

यावल- नॅशनल एज्युकेशन सोसायटीमध्ये आजी-माजी संचालकांनी 1995 ते 2018 पर्यंतच्या कालावधीत लबाडी करण्याच्या इराद्याने शासनाची, जनतेची व नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यांची बनावट दस्तावेज तयार करून विश्वासघात व फसवणूक करीत सुमारे एक ते दिड कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी यावल न्यायालयात सोसायटीच्या आजी-माजी एकुण 13 संचालकाविरूध्द तक्रार दाखल केलयनंतर न्यायालयाने 1 एप्रिल संबंधितांविरुद्ध प्रोसेस इश्यू जारी केल्याने शिक्षण संस्थेच्या संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. यावल येथील तसेच नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सभासद अब्दुल करीम कासम कच्छी यांनी सर्वात प्रथम सोसायटीच्या एकूण 13 आजी-माजी संचालकांविरूध्द यावल पोलिसात लेखी फिर्याद दिली होती मात्र पोलिस प्रशासनाने दखल न घेलतल्याने तक्रारदाराने यावल न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात फौजदार खटला दाखल केल्यानंतर यावल न्यायालयाने दिनांक 1 रोजी संबंधितांविरुद्ध प्रोसेस इश्यू जारी केला आहे. या निर्णयामुळे सोसायटी संचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादी अब्दुल करीम कासम कच्छी यांच्यातर्फे अमळनेर येथील अ‍ॅड.सलीम खान यांनी काम पाहिले.

हे आहेत संस्थेचे आजी माजी संचालक
मोहम्मद ताहेर शेख चाँद, मुस्तफा खान सुभान खान, रफिउद्दीन हाजी शेख शरफोद्दीन, फजलु रहेमान खा हुसेन खान, शे.इब्राहीम शे.चांद, हुसेन खा भिकारी खा, गुलाम रसुल अब्दुल नबी, अताउल्लाखा सैफउल्ला खा, अजीजखा अमित खा, अख्तर हुसेन, हाजी शेख करीम, इसरारी उद्दीन हाजी कमरोद्दीन, करीम खा नसीर खा, बशीर खा उस्मान खा या 13 नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी संचालकांविरुद्ध प्रोसेस इशू जारी झाल्याने खळबळ उडाली आहे.

सोसायटीत केलेले संशयास्पद कृत्य
सोसायटीचे कार्यकारी मंडळ तथा संचालकांनी 1995 ते 2018 या कालावधीत बेकायदेशीर घटनाबाह्य कामकाज केले असून जळगाव धर्मदाय आयुक्तांकडून कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीररित्या वर्गणी समाजातील लोकांकडून किंवा राजकीय पक्षाकडून घेण्यात आली आहे. बेईमानी व लबाडी करण्याच्या उद्देशाने शासनाचा तसेच सोसायटीचे सभासद व लोकांचा विश्वासघात करून फसवणूक करून सुमारे एक ते दिड कोटींचा अपहार केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.