मुख्याधिकार्यांसह नगरसेवकांवर कारवाईबाबत निवेदन
यावल– रावेर पालिकेचे मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे 30 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर यावल पालिकेतील कर्मचार्यांनी त्यांना 6 डिसेंबर रोजी पालिकेच्या सभागृहात निरोप दिला. जेथे सभा घेतल्या जातात त्या टेबल व बाकड्यांचा टेबल म्हणून वापर करण्यात आल्याने व सभागृहाचा अवमान झाल्याने मुख्याधिकारी सोनवणे व त्या नगरसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यांनी दिले निवेदन
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनावर माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक राकेश कोलते, रूखमाबाई नथ्थू भालेराव, देवयानी गिरीश महाजन, पौर्णिमा राजेंद्र फालक, नौशाद बी. मुबारक तडवी, कुंदन सुधाकर फेगडे, गणेश नथ्थू महाजन, मुबारक फत्तु तडवी, गिरीश प्रकाश महाजन, राजेंद्र घनश्याम फालक, राजेश कडू महाजन, एजाजोद्दीन देशमुख यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.