आठ दिवसात पोस्टाने निकाल पाठवणार -पंकजा मुंडेंचे आश्वासन
यावल- यावल पंचायत समिती सभापती संध्या किशोर महाजन यांच्या अपात्रतेविषयी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेवून पुढील हप्त्यात निर्णय घरपोच पोस्टाने पाठविला जाईल, असे आश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. जिल्हाधिकार्यांनी सभापती संध्या किशोर महाजन यांना पंचायत समितीचे भाजपा गटनेते दीपक पाटील यांच्या तक्रारीवरून अपात्र केले होते. या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाकडे अपिल करण्यात आले होते. त्या संदर्भात पंकजा मुंडे यांच्याकडे सुनावणी झाली. दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकूण घेण्यात आले मात्र निकाल राखीव ठेवून तो येत्या आठ दिवसात पोस्टाने पाठवू, असे प्रसंगी सांगण्यात आले. या निकालाकडे संपूर्ण यावल तालुक्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.