यावल पालिका पोटनिवडणूक ; समीर मोमीन यांची नगरसेवकपदी बिनविरोध वर्णी

0

यावल- यावल नगरपरीषदेचे नगरसेवक बशीर सेठ मोमीन यांचे निधन झाल्याने रीक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती तर या निवडणुकीत स्व.बशीर सेठ यांचे चिरंजीव समीर मोमीन यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने समीर यांची बिनविरोध निवड झाली तर काँग्रेसने ही जागा पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवल्याने समीरचा माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, मसाका चेअरमन शरद महाजन, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, यावल बाजार समितीचे माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, शहराध्यक्ष कादीर खान, शब्बीर खान, काँग्रेस गटनेता युनूस सेट, नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक मनोहर सोनवणे, अल्पसंख्यांक विभागाचे जाकीर शेख, समीर खान, नगरसेवक रईस खान, शेख अयुब, अनिल जंजाळे आदींनी त्यांचा सत्कार केला.