यावल पालिकेत अखेर उपनगराध्यक्ष ठरले पदसिद्ध सभापती

0

यावल- पालिकेची गुरूवारी विषय समित्यांच्या सदस्य निवडसभा पार पडली. त्यात उपनगराध्यक्ष हे बांधकाम समितीवर पदसिध्द सभापती देण्या वरून पालिकेतील चार गटात एकमत झाले नाही तर दोन गट विरोधात होते. परीणामी मतदान घेण्यात आले. त्यात सातविरूध्द 11 अशा मतदानाने सत्ताधार्‍यांनी पालिकेत आपले पारडे जड सिध्द केले व उपनगराध्यक्षांना पदसिध्द सभापती पद देण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी पीठासन अधिकारी तहसीलदार कुंदन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष सुरेखा कोळी, यांच्या उपस्थितीत शिक्षण, बांधकाम, पाणीपुरवठा, महिला बाल कल्याण व आरोग्य समितीच्या सदस्यांची निवड पार पडली. त्यात सुरवातीला उपनगराध्यक्षांना बांधकाम समितीवर पदसिध्द सभापती देण्याचा विषय आला त्यास महर्षी व्यास शविआ व शहरविकास आघाडीचे गटनेते अतुल पाटील, राकेश कोलते यांनी विरोध केला तेव्हा एकमत न झाल्याने सभागृहात मतदान घेण्यात आले. त्यात विरोधांचे सातविरूध्द सत्ताधार्‍यांनी 11 मते घेत हा उपनगराध्यक्षांना बांधकाम समितीचे पदसिध्द अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला.

समितीनिहाय सदस्य असे- बांधकाम- अतुल पाटील, मुकेश येवले, सैय्यद युनूस व शमशाद बेगम खान

शिक्षण- मनोहर सोनवणे, रईस खान, पोर्णिमा फालक, देवयानी महाजन व अतुल पाटील

पाणीपुरवठा- शेमशाद बेगम खान, रजीयाबी गुलाम रसुल, राकेश कोलते, देवयानी महाजन व रूख्माबाई भालेराव-महाजन.

महिला व बाल कल्याण- नौशाद तडवी, कल्पना वाणी, दवयानी महाजन, शिला सोनवणे व शमशाद बेेगम खान

आरोग्य व स्वच्छता- सैय्यद युनूस, शेख असलम, मुकेश येवले, देवयानी महाजन व अतुल पाटील

रावेर पालिकेतही विषय समिती सदस्यांची निवड
रावेर- पालिका सभागृहात गुरुवारी पीठासन अधिकारी विजयकुमार ढगे यांच्या उपस्थिती विषय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. प्रसंगी रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, मुख्याधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. समितीनिहाय सदस्य असे-

पाणीपुरवठा व जिलनिस्सारण- पार्वताबाई शिंदे, शेख नुसरत यास्मीन, सुधीर पाटील, जगदीश घेटे, यशवंत दलाल.

महिला बालकल्याण समिती- रंजना गजरे, संगीता अग्रवाल, शेख नुसरत यास्मीन कलीम, ललिता बर्वे, शारदाबाई चौधरी

नियोजन व विकास समिती- संगीता वाणी, सादीक अब्दुल नबी, राजेंद्र महाजन, असदउल्लखा मेहबूबखा, सुधीर पाटील

सार्वजनिक बांधकाम समिती- आसीफ मोहम्मद दारा मोहम्मद, संगीता अग्रवाल, राजेंद्र महाजन, सादीक अब्दुल नबी, संगीता महाजन

स्वच्छता व आरोग्य समिती- हमीदाबी अयुब पठाण, सुरज प्रकाश चौधरी, ललिता बर्वे, प्रकाश अग्रवाल, प्रल्हाद महाजन