यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील मोहराळा येथील ग्राम पंचायत सदस्य यशवंत पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या यावल तालुका उपाध्यक्ष पदी यशवंत विलास पाटील यांची निवड करण्यात आली आहे .
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या यावल तालुका उपाध्यक्ष पदी मोहराळा येथील ग्राम पंचायत सदस्य यशवंत पाटील यांची निवड राष्ट्रवादी युवक चे यावल तालुका अध्यक्ष पवन पाटील यांनी केली. सदर निवडीचे पत्र हे बैठकीत राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष युवकचे जळगाव जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आले . या वेळी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,राष्ट्रवादी युवक चे तालुका अध्यक्ष पवन पाटील जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील ,,रोहन महाजन,मयूर पाटील, दिलीप पाटील,प्रसन्न पाटील, सागर सोनवणे,विशाल पाटील ,भैय्या पाटील,मोहसीन खान ,योगेश पाटील, समाधान पाटील, गिरीश पाटील, निलेश बेलदार,शरीप तडवी,भारत महाजन,रणधीर पाटील,शब्बीर तडवी, सलीम तडवी,आमिर खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते