यावल येथे उष्माघाताने 55 वर्षीय इसमाचा मृत्यू

0

यावल । जामनेर तालुक्यातील चिंचोली-पिंप्री येथील रहिवासी अमरसिंग रामसिंग पाटील या 55 वर्षीय इसमाचा उष्माघाताने यावल ग्रामीण रुग्णालयात मंगळवार 16 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमरसिंग पाटील यांना सोमवारी मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवत असल्याने ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर डॉ.स्वप्नील पाटील व सहकार्‍यांनी औधधोपचार केले. मात्र याचा काही उपाय न झाल्याने उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचे निधन झाले. याबाबत चिंचोली येथील सरपंच विनोद चौधरी यांनी सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून अमरसिंग हे रावेर तालुक्यातील रोझोदा येथे विहीर खोदण्याच्या कामासाठी आले होते. याबाबत डॉ. स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल येथील पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद करण्यात आली.