यावल शहरातील महिलेच्या खून प्रकरणी आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

Murder of married woman in Yawal city : Accused remanded to police custody till September 1 यावल : शहरातील काजीपुरा वस्तीत जून्या वादातून 38 वर्षीय विवाहितेचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी अटकेतील तरुणास 1 सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

डोक्यात कुर्‍हाड मारून केली हत्या
शहरातील काजीपुरा वस्तीतील नाजीया खलील काजी (38) या महिलेची जुन्या वादातून संशयीत आरोपी जावेद युनूस पटेल (23) याने डोक्यात कुर्‍हाडीने वार करीत हत्या करण्यात केली होती व स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला होता. या संशयीत आरोपीला रविवारी सकाळी यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्याफएम.एस.बनचरे यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता त्याला 1 सप्टेंबर पर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलिस निरीक्षक विनोद गोसावी, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, हवालदार जगन्नाथ पाटील करीत आहे.

जुन्या वादातून काढला वचपा
मयत महिलेने 5 मे 2022 रोजी मध्यरात्रीनंतर रात्री दोन वाजता जावेद पटेल यास कॉल केला व घराबाहेर बोलावले होते. यावेळी घराबाहेर शेख मुजम्मिल उर्फ मुज्जू शेख हकीम (26), हिदायत अली उर्फ राजू शेखावत अली (20) व शेख शोएब शेख इक्बाल खाटीक (29, तिघे रा.ताहानगर, फैजपूर) यांनी तरुणाला दुचाकीवर बसवून भुसावळ रस्त्यावर असलेल्या घोडे पीर बाबा दर्गाजवळ नेत त्याच्यावर चाकूने वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता व त्या घटनेत बचावल्यानंतर हा वचपा जावेदने काढल्याची चर्चा आहे.