यावल शहरातील 52 वर्षीय प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

52-year-old Isma of Yawal city committed suicide by hanging herself यावल : शहरातील धनगरवाडा भागातील रहिवासी 52 वर्षीय इसमाने घराच्या जवळ असलेल्या रेशन दुकानाच्या मागील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राजेंद्र गंगाधर कचरे (52, धनगरवाडा, यावल) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कचरे हे रात्री आपल्या कुटुंबासह झोपले होते व ते पहाटे पूर्वी घरातून बाहेर पडले. त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता घराच्या जवळच असलेल्या रेशन दुकानाच्या मागील बाजूस लिंबाच्या झाडाला राजेंद्र कचरे यांचा मृतदेह सुताच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत शनिवारी आढळाल. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात डॉ.शिवदास चव्हाण यांनी शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवला. याप्रकरणी धनराज उर्फ बबलू कचरे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.