यावल शहरातून तरुणाचा मोबाईल लंपास

Young man’s mobile stolen from Yawal City यावल : शहरातील खिर्णीपुरा भागातील रहिवासी एका तरुणाचा भाजीपाला घेत असतांना भामट्याने मोबाईल लांबवला.

यावल पोलिसात गुन्हा
यावल शहरातील बुरूज चौकापुढील खिर्णीपुरा भागातील रहिवासी शेख अबूजर शेख गफूर (18) हा तरुण बाजारात भाजीपाला घेण्यास गेला असता गर्दीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात भामट्याने त्याच्या खिशातुन अलगतद 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. तरुणाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध यावल पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.