यावल शहरात ट्रकची अ‍ॅपेला धडक : अ‍ॅपे चालकासह चौघे जखमी

A speeding Truck collided with an Ape Near Yaval College : Four Injured यावल : शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या महाविद्यालयाजवळ भरधराव ट्रकने अ‍ॅपे रीक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. रविवारी दुपारी दोन वाजता हा अपघात घडला. अपघातप्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांनी स्वत:हा घटनास्थळावर थांबून जखमींना स्वतःच्या वाहनातून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये नेत तेथे स्वत:हा उपचारा करीता मदत करीत माणुसकीचे दर्शन घडवले. दरम्यान, अपघातातील जखमी एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला जळगावी हलवण्यात आले.

अपघातात शेतमजूर जखमी
यावल शहराच्या बाहेर फैजपूर रस्त्यावर महाविद्यालयाजवळून रविवारी दुपारी दोन वाजता अ‍ॅपे (क्रमांक एम.एच.19 बी.एम.3915) ने चालक प्रमोद अरुण सोनार (42, रा.हिंगोणा) हे शेतमजूर घेऊन यावलकडून फैजपूरकडून हिंगोणा गावी जात असताना समोरून यावल शहराकडे भरधाव ट्रक (क्रमांक आर.जे.10 बी.4284) घेऊन चालक सचिनसिंग उदयसिंग (रा.नगगला सिकंदर, जि.फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) हा येत असताना ट्रकची अ‍ॅपेला जबर धडक बसली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला.

महिलेची प्रकृती गंभीर
अपघातातील जखमींवर डॉ.कुंदन फेगडे यांच्यासह रुग्णालयाचे डॉ.जिशान खान, अधिपरीचारीका मनीषा धांडे, दीपाली किरंगे, पिंटू बागुल, संजय जेधे, प्रवीण बारी आदींनी प्रथमोपचार केले. या अपघातात चालक अ‍ॅपे चालक प्रमोद अरुण सोनार (42), फकिरा नवाब तडवी (32), जहानुरबाई खिताब तडवी (40) व सुलाबाई जगन तायडे (55, सर्व रा.हिंगोणा) हे जखमी झाले. जहानुरबाई तडवी यांच्या डोक्या दुखापत झाल्याने त्यांना जळगावी हलवण्यात आले.