शेतकरी हिताच्या विषयात राजकारण नाही -आमदार हरीभाऊ जावळे
यावल- शहरातील खरेदी-विक्री संघ आवारात शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ नुकताच आमदार हरीभाऊ जावळे यांच्याहस्ते काटा पूजनाने झाला. आमदार जावळे म्हणाले की, सरकारने ज्वारीला दोन हजार 430 रुपये एवढा भाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नोंदणी केलेल्या शेवटच्या शेतकर्याचे भरड धान्य खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकरी हिताच्या विषयात आपण कधीही राजकारण करत नाही, प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतो, असेही ते म्हणाले.
तर उद्या काँग्रेसचे सरकार ! आमदारांच्या शाब्दीक कोटीला मिळाली दाद
आमदार हरीभाऊ जावळे यांनी भाषणात सांगितले की,, सरकार कुणाचेही असो शेतकरी हितासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र आलेे पाहिजे. आज भाजपचे सरकार आहे, उद्या काँग्रेसच येईल तर तर परवा पुन्हा भाजपचे येईल, अशी शाब्दिक कोटी केली. मध्येच थोडेसे थांबून हे केवळ उदाहरण आहे. उद्या काँग्रेसचे सरकार येईल म्हणजे खरचं येईल, असे नाही.तर 100 टक्के पुन्हा भाजपचेच सरकार येईल हे लक्षात घ्या, असे त्यांनी सांगताच हास्याची लकेर उमटली.
यांची होती उपस्थिती
यानंतर भरड धान्य मोजणी शुभारंभात पाच शेेतकरी व मसाकाला थकहमी मिळवून दिल्याने आमदार जावळेंचा सर्वपक्षीयांना छोटेखानी सत्कार झाला. बाजार समितीचे सभापती भानुदास चोपडे, उपसभापती कांचन फालक, तहसीलदार कुंदन हिरे, संचालक भारती चौधरी, शेतकी संघाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, व्हॉइस चेअरमन यशवंत तळेले, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, शिवसेना उप जिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, माजी सभापती नितीन चौधरी, निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष विलास चौधरी, कृषिभूषण नारायण चौधरी, कोरपावली विकासोचे चेअरमन राकेश फेगडे, नगरसेवक दीपक बेहेडे, विलास चौधरी, अमोल भिरूड, तेजस पाटील, सेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणेे, उमेश फेगडे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.