यावल शेतकी संघाची निवडणूक बिनविरोध

0

यावल : 17 संचालक असलेल्या येथील तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाची सार्वत्रिक निवडणूक अखेर बिनविरोध झाली. सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे नऊ व भाजपा-सेना आठ जागा मिळाल्या आहेत तर सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सभापती तर सेना-भाजपकडे उपसभापती पद राहिल, असा निर्णय घेण्यात आला.

हे उमेदवार बिनविरोध
नरेंद्र नारखेडे, गणेशनेहेते, तुषार उर्फ मुन्ना सांडूसिंग पाटील, सुनील बाळकृष्ण नेवे, उमेश रेवा फेगडे, प्रभाकर नारायण सोनवणे, आर.जी.पाटील, अमोल भिरूड, सुनील फिरके, विनोद पंडित पाटील, नितीन चौधरी, प्रशांत चौधरी, नीलिमा केतन किरंगे, नितीन शंकर नेमाडे, यशवंत तळेले, तेजस धनंजय पाटील व भारती नारायण चौधरी.