किंग्जस्टन । यासिर शाहच्या दमदार फिरकीच्या बळावर पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 121 धावांनी पिछाडीवर असलेल्या वेस्ट इंडीजचा दुसरा डाव यासिर शाहच्या मार्यासमोर अवघ्या 152 धावांत गुंडाळला गेला. त्यामुळे विजयासाठी मिळालेले 32 धावांचे आव्हान पाकिस्तानने तीन विकेट गमावून साध्य केले.
मिस्बाहने लगातार दोन षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा डाव 286 धावांमध्ये आटोपला. प्रत्युत्तरात मिसबाह आणि युनिस खान(58), सरफराज अहमद (54) यांच्या अर्धशतकांच्या बळावर 407 धावा करत 121 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात 121 धावांनी पिछाडीवर असलेल्या यजमान वेस्ट इंडीज संघाचा दुसरा डाव शाहसमोर अवघ्या 152 धावात गुंडाळला.