मुंबई: उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. प्रिया आणि उमेश यांचा प्रेमविवाह असून त्यांची जोडी त्यांच्या फॅन्सना खूपच आवडते. प्रियाचा आज म्हणजेच १८ सप्टेंबरला वाढदिवस असून टाइमपास, वजनदार, काकस्पर्श, आम्ही दोघी यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात तिने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिला आज मानले जाते.
हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र एकमेकांवर असणाऱ्या प्रेमाची कबुली पहिली देणार कोण यामुळे काहीशी अडचण झाली. अखेर प्रियाने आपले उमेशवर असलेले प्रेम व्यक्त केले. मात्र उमेश या प्रेमाच्या नात्याला लग्नाच्या रूपात बदलण्याबाबत साशंक होता. याला कारण म्हणजे उमेश आणि प्रिया यांच्यातील वयाचं अंतर.
दोघांच्या वयात आठ वर्षांचे अंतर आहे. उमेश प्रियापेक्षा आठ वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे लग्नाबाबत होकार द्यायला त्याने एक दोन नाही तर तब्बल सहा महिन्याचा वेळ घेतला. खुद्द प्रियानेच याबाबतची माहिती एका मुलाखतीत दिली आहे. या सगळ्या कालावधीत आपण स्वतःला लंपट समजू लागल्याचेही तिने गंमतीने म्हटलं होते. मात्र सहा महिन्यांनंतर का होईना उमेशने लग्नाला होकार दिला आणि ऑक्टोबर २०११ मध्ये दोघं रेशीमगाठीत अडकले.