मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार होते. ते काय निर्णय घेणार? तसेच कोणती कोणती घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला असून त्यांनी राज्यातील जनतेला त्रिसूत्रीच्या अंमलबजावणी संदेश दिला आहे. कोरोना महामारीवर सध्या काहीही ठोस उपाय नाही. मात्र मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा आणि वारंवार हात स्वच्छ करा. या त्रिसूत्रीचाच वापर करून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील जनतेच्या संयमाचा तोड नाही असे सांगत त्यांनी जनतेवर नाराजी देखील व्यक्त केली आहे. विनाकारण गर्दी करणे, मास्क न लावणे यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षावर देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला आहे. ‘हे सुरू करा ते सुरू करा, हे उघडा, ते उघडा’ म्हणणाऱ्या विरोधकांची महाराष्ट्र स्वस्थ राहावा ही जबाबदारी नाही का? असा सवालही त्यांनी केला आहे.