मुंबई: कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आपण कोरोना रुग्णवाढीच्या शिखराच्या जवळ पोहोचलो आहोत. पुढच्या आठवड्यात कोरोनाची लाट ओसरू लागेल. महिना अखेरीला दररोज आढळून येणार्या कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण कमी होऊ लागेल, असे डॉ. ओक यांनी सांगितले आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या महिनाभरापासून झपाट्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद आहे. मागील ४ दिवस देशात दिवसाकाठी दीड लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १ लाख ८४ हजार ३७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेनं सगळेच विक्रम मोडीत काढले आहेत देशात कोरोनाची दुसरी लाट असताना भारतासाठी आनंदाची बातमी मिळाली आहे.