या प्रकरणाची सखोल चौकशी करणार : आ. जगताप

0

संत तुकारामनगरमधील दुर्देवी घटना

पिंपरी : संत तुकारामनगरमधील टपरीधारकाने केलेली आत्महत्त्या ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. लोकसेवकाचे नाव लिहून त्याने जीव दिला. या नगरसेवकांनी खरच त्रास दिला आहे का, याबद्दल चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

मृत व्यक्ती फॅब्रिकेशन व्यावसायिक
नेहरूनगर परिसरामध्ये फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे टपरीधारक सचिन सुरेश ढवळे (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी सोमवारी (दि.28 रोजी) गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये भाजप नगरसेविका सुजाता सुनील पालांडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. त्यानुसार भाजपच्या नगरसेविका पालांडे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पिंपरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्त चौकशी होणार
या प्रकरणाबाबत विचारले असता भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप म्हणाले की, सचिन हा टपर्‍या बनविणारा कारागिर होता. एक टपरीचे 25 हजार रुपये घेतले जात होते. परंतु, त्याला 25 हजार रुपये मिळत नव्हते. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, याची खंत वाटते. यामध्ये चूक कोणाची आहे, यासाठी महापालिकेचे अधिकारी काय करीत होते याची सविस्त चौकशी केली जाईल. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल