मुंबई-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा संपूर्ण राज्यभरात सुरु आहे. आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.
हे सरकार आल्यापासून सीबीआय, आरबीआयमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केले जात आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणले जात आहे. गो-हत्येच्या संशयावरून हत्या केली जाते. सामान्य नागरिक नाही तर सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना देखील जीवे मारले जात आहे. या सरकारची कामगिरी ‘हम करेसो कायदा’ अशी असल्याची जबरी टीका छगन भुजबळ यांनी केली.
अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून भुजबळ यांनी या सरकारच्या विरोधात कोणी बोलले, आपले विचार व्यक्त केले तर त्याला पाकिस्तानात जा असे सांगण्यात येते. खरी परिस्थिती सांगितली तर पाकिस्तानात जाण्याचे सांगितले जाते.
मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येण्यापासून लेखिका नयनतारा सहेगल यांना रोखण्यात आले. सहेगल ह्या खरी परिस्थिती मांडतील, सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणतील या भीतीने सरकारने त्यांचे निमंत्रण रद्द केले असे आरोपही छगन भुजबळ यांनी यावेळी केले.