पुणे : पुण्याच्या मेट्रो रेल प्रकल्पाला सरकारने गती दिली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले. पुणे मेट्रो रेलचा प्रकल्प अहवाल २०१० साली दिल्ली मेट्रो कार्पोरेशनने सादर केला. २०१५ सालापर्यंत त्या प्रकल्पात कोणतीही प्रगती झाली नव्हती . मात्र २०१५ साली राज्य सरकारने पुणे मेट्रोला चालना दिली आणि वर्षभरात २५ टक्के काम पुढे नेले असे फडणवीस यांनी म्हटले आहे .
फडणवीस सरकारने पुणे आणि नागपूर मेट्रो या दोन कंपन्या एकत्र करून महामेट्रो कंपनी स्थापन केली. प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला. सध्या पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज कॉर्नर ते रामवाडी मार्गाचे काम प्रत्यक्ष जागेवर प्रगतीपथावर आहे. मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्ता , पुणे मुंबई रस्ता येथे वाहतुकीची गैरसोय होते .परंतु काम वेगाने चालू असल्याने नागरिकांचे सहकार्य महामेट्रोला मिळाले आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होवू नये याची दक्षता महामेट्रो आणि पोलिस खात्याने घेतली आहे .