युकी भ्रांबीच्या पराभवाने भारताला बसला झटका

0

पुणे । टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताचे प्रमुख आशास्थान असलेल्या युकी भांब्रीला फ्रान्सच्या पियरे-ह्यूग्स हर्बर्टला तीन सेटमध्ये 6-4, 3-6, 4-6 असा पराभव पत्कारावा लागला. बालेवाडी छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या स्पर्धेतील हा सामना युकीसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा आव्हानात्मक सामना होता. सामन्यातला पहिला सेट 6-4 असा जिंकून युकीने चांगली सुरुवात केली होती. पण नंतर मात्र त्याला या खेळाचे सातत्य राखता आले नाही. या सामन्यामध्ये एकूण 13 बिनतोड सर्विस करत, हर्बर्टने वर्चस्व राखले.

जागतिक क्रमवारीत आठवा मानांकित असलेल्या हर्बर्टचा उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित मरीन सिलीकशी सामना होण्याची शक्यता आहे. भारताच्या रामकुमार रामनाथनने सिलिकविरुद्ध विजय मिळवल्यास उपांत्यपूर्व फेरीचा पेपर हर्बर्टसाठी खूपच सोपा ठरण्याची शक्यता आहे. पुरुषांच्या एकेरीच्या अन्य लढतींमध्ये दुसर्‍या फेरीत स्थान मिळवणार्‍या चौथ्या सीडेड बेनोइट पेअरने मार्टन फ्यूससोविक्सचा 6-4, 6-7, 7-6 असा पराभव केला होता. ही लढत तीन तासांपेक्षा अधिक काळ रंगली होती. उपांत्यपूर्व फेरीत जागतिक नंबर 41 पेरीआधीच्या पहिल्या फेरीत त्याला बाय मिळाला होता परंतु फ्यूसॉव्हिक्सविरुद्धच्या दीर्घ सामन्यासाठी त्याचा परीणाम झाला. पाचव्या मानांकित रॉबिन हासेलाही पहिल्या सेटमध्ये 6-3 असा विजय मिळवून निकोलस जेरीविरुद्ध दुसर्‍या फेरीत सामना करावा लागला.