चाळीसगाव – शहरातील युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिताताई बच्छाव यांच्या संकल्पनेतून पोलिस परिवारातील तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला वर्गासाठी दोन दिवशीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यात मोराची चिंचोली येथील पर्यावरणाबाबत भौगोलिक माहीती जाणून घेण्यात आली. प्रवासाच्या सुरुवातीस शनीशिंगणापुर, रांजणगांव आणि मोराची चिंचोली येथील पर्यटनस्थळी भेट देण्यात येवून माहीती जाणून घेण्यात आली.
या सफरीत स्मिता बच्छाव, लता जाधव, उषा पाटील, पुष्पा बडगुजर, अलका राठोड, प्राजक्ता पाटील, रेखा पाटील, कविता शिंदे, अनिता रोकडे, छाया गुणावत, अर्चना चौधरी, वर्षा जाधव, मनीषा पाटील, विद्या चित्ते, अनिता शितोळे, सुचित्रा पाटील, सोनल शेळके, योगिता पाटील, छाया पाटील, विद्या कोतकर, मीना भोसले, योगिता राजपूत, छाया पाटील आदी महिलांसह बाळगोपाळांनी सहभाग नोंदविला.