युती करावी की नाही सेनेने ठरवावे, मात्र राम मंदिरासाठी सोबत यावे-संघ

0

मुंबई- आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने अनेकदा स्वबळाचा नारा दिला आहे. भाजपशी युती व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढाकार घेणार नाही. भाजपाशी युती करायची की नाही, हे शिवसेनेने ठरवावे. पण राम मंदिराबाबसाठी त्यांनी आमच्यासोबत येऊ यावे असे आवाहन संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी आज केले.

केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत असूनही शिवसेना अगदी नित्यनेमाने नरेंद्र आणि देवेंद्र सरकारवर टीका करते. दोन्ही पक्षातील दरी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. युतीबाबत जोशी यांना विचारण्यात आले असता त्यांनी मी भाजपाचाही प्रवक्ता नाही आणि शिवसेनेचाही नाही. युतीचे काय करायचे ते त्यांचे त्यांनी बघावे, असे ते म्हणाले. मात्र त्याचवेळी, राम मंदिराबाबत उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या आग्रही भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं. २५ नोव्हेंबरला उद्धव अयोध्येला जाणार आहेत. राम मंदिरासाठी सरकावर दबाव वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या मुद्द्यावर शिवसेनेनं संघासोबत यावं, असं आमंत्रणच भय्याजी जोशी यांनी दिले.