जळगावचे संपर्क प्रमुख डॉ. संजय सावंत, रावेरचे विलास पारकर यांनी घेतल्या बैठका
शिवसेना कार्यकर्त्यांची इच्छा : ना. गुलाबराव पाटील यांची माहिती
जळगाव – वरिष्ठ स्तरावर भाजप -सेना युतीवर शिक्कामोर्तब होत असतांना जळगावात आज सकाळी झालेल्या जिल्हा बैठकीत अनेक शिवसैनिकांनी युतीला विरोध करून जळगाव लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेला मिळावी अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकार परीषदेत दिली. यावेळी संपक प्रमुख संयज सावंत यांच्यासह जिल्हाप्रमुख गुलाब वाघ,चंद्रकांत पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज शहरातील एका हॉटेलात संपर्क प्रमुख डॉ. संजय सावंत व विलास पारकर यांनी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी पदाधिकार्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकिनंतर अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परीषदेत माहिती देतांना ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने आज घेण्यात आलेल्या बैठकीत दोन्ही मतदार संघातील कामांचा आढावा घेण्यात आला.
युतीबाबत संमिश्र प्रतिक्रिया
यात राजकीय परिस्थिती, शेतकर्यांचे प्रश्न, पुलवामा घटना व युतीसंदभातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रमुख कायकत्यांची मते संपर्कप्रमुखांनी जाणून घेतली.आज झालेल्या बैठकित युतीबाबत शिवसैनिकांकडून संमिश्र प्रतिक्रीया व्यक्त झाल्या. युती करु नये असाच बहुसंख्य पदाधिकारी व शिवसैनिकांचा आग्रह असुन युती झाली तरी जळगावची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याकडे केली आहे. असे असले तरी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे जो निणय घेतील तो सर्वांना मान्य राहील असेही ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
राहुल गांधी पंतप्रधान असते तरी पाठींबा दिला असता
पुलवामा घटनेनतंर भाजपाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी घेतलेल्या सभा व प्रचार रली याबाबात प्रतिक्रीया विचारली असता, शिवसेनेने या घटनेमुळे कार्यक्रम रद्द केलेत. भाजपाने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्यासाठी देश महत्वाचा असुन राहुल गांधी पंतप्रधान असते तरी अशी घटना घडल्यानंतर आम्ही त्यांच्या पाठीशी राहीलो असतो असेही ना. पाटील यांनी सांगितले.
प्रशांत किशोर टीमकडून आढावा
शिवसेनेच्या बैठकित इलेक्शन मॅनेजमेंट गुरू प्रशांत किशोर यांच्या टीमने पदाधिकार्यांशी चर्चा केली. याबाबत विचारले असता डॉ. संजय सावंत यांनी सांगितले की, पक्षाने स्वतंत्र समीक्षक पाठविले आहे. ते पक्षांतर्गत आढावा घेत असल्याचे त्यानीं सांगितले.
Prev Post