युध्द परवडणार नसल्याने पाकिस्तानकडून तणाव कमी करण्याचा प्रस्ताव

0

नवी दिल्ली: भारताबरोबरआपल्याला युध्द करणे आता परवडणार नाही, हे पाकिस्तानच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याचा प्रस्ताव भारताकडे दिले आहे. दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या अधिकृत लष्करी संवादाच्या माध्यमातून पाकिस्तानने हा प्रस्ताव दिला आहे असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

भारत व पाकिस्तान या दोन देशाचे डीजीएमओ एकमेकांच्या संपर्कात असून या स्तरावरील चर्चेदरम्यान हा प्रस्ताव दिला असल्याची शक्यता आहे. पाकिस्तानने एलओसीवर असलेले स्पेशल सर्विस ग्रुप मागे घेण्यास तयार आहे. एसएसजी पाकिस्तानी लष्कराचे युनिट आहे. युद्धादरम्यान नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांनी तोफखाना वापरू नये. असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

बालाकोट एयर स्ट्राईकनंतर पाकिस्तान लष्कराने आपल्या तुकड्या नियंत्रण रेषेजवळ तैनात केल्या होत्या.