संस्कृती फाउंडेशनचा आगळा-वेगळा उपक्रम
भुसावळ– शहरात गेल्या तीन वर्षापासून पर्यावरण स्वच्छता आणि सामाजिक कार्य करणार्या संस्थेच्या युवकांनी भुसावळ शहराला लागलेला अस्वच्छतेचा डाग पूर्णपने स्वच्छ करण्यासाठी परीश्रम घेत आहे. छत्रपती शिवाजी व्यापार संकुलासमोरील रेल्वेच्या भिंतीचा लूक बदलण्यात आला असून त्यात शहर स्वच्छतेबद्दल आवाहन करण्यात आले आहे. शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांचीही त्यासाठी मदत घेण्यात आली. अतिशय बकाल झालेली भिंत आता बोलू लागली असून उपस्थितांचे आपसुकच लक्ष वेधले जात आहे.
** पालिकेनेही केले सहकार्य
भुसावळ नगरपालिकेतर्फे संस्कृती फाउंडेशनला कलर, ब्रश व रंगकामासाठी लागणारे साहित्य देण्यात आले. 9 फेब्रुवारीपासून सर्व युवक सकाळी सात वाजेपासुन तर रात्री 12 वाजेपर्यंत भिंतीवर स्वच्छता संदर्भात संदेश रंगवू लागले. सलग हाच उपक्रम दुसर्या दिवशीदेखील राबवण्यात आली. संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत हे भुसावळ नगरपालिकेचे स्वच्छतादूत असून गेल्या तीन वर्षापासून ते आपल्या स्वयंसेवकांतर्फे शहरात वेगवेळे सामाजिक उपक्रम राबवित आहे.
** यांनी केली भिंत बोलकी
या संपूर्ण कार्यासाठी संस्कृती फाऊंडेशचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, स्वच्छता मित्र लिनेश पाटील, शुभम तायडे, शुभम पाटिल, रक्षा अग्रवाल, तुषार गोसावी, हर्षल ठोके, अजय पाटील, जोस्त्ना झारखंडे, नम्रता चांडक, गायत्री चौधरी, सावन चौहाण, सुमित महाजन, हर्षल येवले, रुपाली चौधरी, दीपिका कोरी, चेतन गायकवाड, पवन कोळी, सीमा पाटील आइी स्वच्छतादुतांनी कार्य केले.