युवकांनी सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक करावा

0

जळगाव । युवकांनी सोशल मिडिया साधनांचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे त्यातच त्यांचा वापर काळजी पुर्वक करवा असे प्रतिपादन दैनिक जनशक्तीचे कार्यकारी संपादक शेखर पाटील यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत आयोजित सोशल मिडियाचा जागृत वापर एक काळाची गरज या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ.मधुलिका सोनवणे होत्या. तर कार्यशाळेचे समन्वयक प्रा.अतुल बारेकर हे उपस्थित होते. तसेच एमबीए आणि बीबीएमच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

भावना दुखावतील अशा पोस्ट टाकू नका
शेखर पाटील पूढे म्हणाले की, सोशल मिडियाचा वापर करताना युवकांनी स्वंय शिष्टाचार निर्धारित करावे. सोशल मिडियाचे फायदे व तोटे त्यांनी सांगितले. वापरकत्र्याने सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक करावा. भ्रमणध्वनीवर प्राप्त झालेल्या पोस्ट पुढे पाठवताना त्यातील सत्यता जाणून घेवून मगच पाठवाव्यात. कुठल्याही जात, धर्म, पंथ, महिला वा कोणाच्याही भावना दुखावतील अशा पेास्ट टाकू नये अथवा त्यांना पसंती देऊ नये. त्यांच्या गंभीर परिणामांचा विचार करावा. युवकांनी स्वत:च्या सृजनशीलतेचा वापर करुन स्वत: तयार केलेली माहिती पाठवावी, असे त्यांनी सांगितले.

मुलांकडे लक्ष देण्याची गरज..
पाटील यांनी व्टिटर, फेसबुक, स्नॅपचॅट आदी सोशल मिडिया साधनांबाबत त्यांनी सरळ व सोप्या भाषेत विविध उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले. यानंतर प्रा.मधुलिका सोनवणे यांनी सजगतेने सोशल मिडियाचा वापर करावा. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेचे प्रास्ताविक अतुल बारेकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रिया नागोलकर या विद्यार्थिनीने केले. डॉ.मिलिंद धनराज यांनी आभार मानले. तसेच यावेळी कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.