युवकांनो, संकल्पात विकल्प ठेवू नका : प्रकाशकुमार मनुरे

नेहरू युवा केंद्रातर्फे तीन दिवसीय जिल्हा दौरा

जळगाव –  देश, गाव, समाज आपला आहे. युवकांनी जागरूक होत थोडासा वेळ देशासाठी आणि समाजसेवेसाठी द्यायला हवा. तुमचा उत्साहामुळे देशाची प्रगती होईल, आपण आत्मनिर्भर होऊ शकतो. युवकांनी पुढाकार घेतल्यास सर्वांची साथ मिळेल आणि देशाचा विकास होऊ शकतो. राष्ट्र निर्माण करण्यासाठी युवकांनी मनात संकल्प करणे आवश्यक आहे आणि त्या संकल्पात कुठलाही विकल्प, पर्याय ठेवू नये, असे नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र, गोवा राज्याचे संचालक प्रकाशकुमार मनुरे यांनी सांगितले.

केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे संचालक प्रकाशकुमार मनुरे हे तीन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. मंगळवारी दुपारी त्यांनी जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आणि युवकांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा.उन्मेष पाटील, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, नाशिक नेहरू युवा केंद्राचे अधिकारी सुनील पंजे, लेखापाल अजिंक्य गवळी, जेष्ठ नाट्यकर्मी विनोद ढगे, राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी रणजित राजपूत, चेतन वाणी आदी उपस्थित होते. उपक्रमासाठी तेजस पाटील, हेतल पाटील, कोमल महाजन, सुश्मिता भालेराव, शंकर पगारे, नेहा पवार, उमेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.