युवकाची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

0

* बेरोजगारीच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचा अंदाज
जामनेर – शहरातील गिरजा कॉलनी भागात राहणाऱ्या २५ वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपार नंतर समजली.मयत युवकाने आत्महत्या केली त्यावेळी घरी कुणीच नसल्याचे कळते. याबाबत अधीक माहिती अशी, गिरीजा कॉलनीतील रहिवाशी दत्तात्रय भोलाणे यांचा मुलगा जिवन (वय-२५) याने दुपारी घरातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यावेळी घरी कुणीच नसल्याचे समजते. जिवनचे घरचे संध्याकाळी बाहेरून घरी आल्यावर या घटनेचा उलगडा झाला. प्राथमिक माहितीतून मयत जिवन राजस्थान येथे कुठेतरी कामाला होता.त्या नंतर ते काम सुटल्यावर त्याने घरी आल्यावर कामासाठी दोन, तीन ठिकाणी तपास केल्याचेही समजते. मात्र तरीही चांगले काम मिळत नसल्याने बेरोजगारीच्या नैराश्येतून त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे चर्चेतून कळते. तशी चिठ्ठीही त्याने लिहून ठेवल्याचे समजते. मयत जिवनला दोन बहीणी असून त्याचे लग्न झालेले आहे. कुटुंबात जिवन एकुलता एक होता. या दुखःदायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जामनेर पोलिस घटनेबाबात नोंदण्याचे काम चालू होते.