युवकास लुटणार्‍या आरोपीस न्यायालयीन कोठडी

0

जळगाव। जळगाव शहरात ट्रॅक्टरचे साहित्य घेण्यासाठी आलेल्या निलेश बापू पाटील (वय 27, रा.नावरे, ता.यावल) या तरुण शेतकर्याला चार महिला व तीन पुरुषांनी घरात बोलावून मारहाण करुन त्याच्याजवळील दोन हजार रुपये रोख लुटले तसेच सोनसाखळी व हातातील अंगठया लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंप्राळा, हुडको येथे गुरुवारी सायंकाळी उघडकीस येऊन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पवन विजयसिंग बागडे, अजरुन विजयसिंग बागडे, मोहम्मद शाहीद मो.सलीम, शारदा श्रावण मोरे, वंदना श्रावण मोरे, काजल लखन तायडे व एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.