जळगाव: युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्ह्यातून जनआशीर्वाद यात्रेचा प्रारंभ होत आहे. ते जळगावात दाखल झाले आहे. सुरुवातीला त्यांच्याहस्ते जळगाव शहरातील इच्छापूर्ती गणपती मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर ते शिरसोलीला रवाना झाले. तेथून पुढील कार्यक्रमासाठी ते पाचोरा येथे जाणार आहे. यावेळी राज्याचे बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आदींसह शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे सकाळी जळगाव विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर तेथून खाजगी वाहनाने ते शहरात दाखल झाले. आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा सहा टप्प्यांत पार पडणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा आजपासून जळगावातून सुरू होणार आहे. या अंतर्गत ते जळगावमध्ये संवाद साधणार आहेत. त्यानंतर १९ तारखेला धुळे-मालेगाव, २० तारखेला नाशिक शहर, २१ तारखेला नाशिक ग्रामीण, अहमदनगर आणि २२ तारखेला अहमदनगर, श्रीरामपूर आणि शिर्डी येथील जनतेशी संवाद साधणार आहेत.