पुणे : क्रीडा भारती पुणे महानगरच्यावतीने ‘युवा दौड 2019’चे रविवारी (दि. 20) सकाळी 6 वा. स.प. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील तब्बल 4 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती प्रदीप अष्टपुत्रे यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, महेश करपे, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. शरद कुंटे, अॅड. एस.के. जैन, धनंजय दामले, पी.ए.इनामदार, राजन गोर्हे, राजीव सहस्रबुद्धे उपस्थित राहतील. यावेळी मॅरेथॉनमध्ये औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी असे 12 ते 55 वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहे. तसेच छत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू सहभागी होतील. विजेत्या धावपटूंसाठी 2 लाखांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
वयोगटानुसार दीड ते 12 किलोमीटर…
युवा दौडमध्ये वयोगटानुसार दीड किमी (सणस मैदान-अभिनव कॉलेज चौक ते स.प. महाविद्यालय), 3 किमी (स.प.महाविद्यालय-अलका टॉकिज चौक-खंडोजीबाबा चौक ते पुन्हा अलका टॉकिज चौक), 4 किमी (स.प. महाविद्यालय-अभिनव महाविद्यालय-नगरकर तालीम चौक-लक्ष्मी रोड-विजय टॉकिज चौक ते पुन्हा अलका टॉकिज चौक) 6 किमी (स.प. महाविद्यालय-अभिनव महाविद्यालय-नगरकर तालीम चौक-लक्ष्मी रोड-विजय टॉकिज-अलका टॉकिज चौक, गुडलक चौक-डेक्कन-खंडोजीबाबा चौक ते पुन्हा अलका टॉकिज चौक)
8 किमी (स.प. महाविद्यालय- अभिनव महाविद्यालय-नगरकर तालीम चौक-लक्ष्मी रोड-विजय टॉकिज-अलका टॉकिज चौक, गुडलक चौक-ज्ञानेश्वर पादुका चौक-म्हसोबा गेट- सिमला ऑफिस- संचेती हॉस्पिटल- जंगली महाराज रोड- बालगंधर्व ते पुन्हा अलका टॉकिज चौक) आणि 12 किमी अशा अंतराच्या स्पर्धा होणार आहेत.