अमळनेर । शहरात प्रथमच होणार्या विभागीय युवा नाट्य, साहित्य संमेलनामुळे अमळनेरच्या किर्तीत मोठी भर पडणार आहे. त्यामुळे या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करू, वैयक्तिक तसेच मित्र परिवार, शासन व पालिकेच्या निधीतून भरघोस निधीही देऊ, असे अभिवचन आमदार शिरिष चौधरी व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी दिले. श्री मंगळदेव ग्रह मंदिरात येथे सप्टेंबरमध्ये होणार्या विभागीय युवा नाट्य, साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी झालेल्या महाबैठकीत हे दोन्ही मान्यवर बोलत होते. या महाबैठकीस सर्वच स्थरावरील मान्यवरांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रास्ताविकात ‘मसाप’ चे कोषाद्यक्ष संदीप घोरपडे यांनी संमेलनाचे एकूणच स्वरूप व व्याप्ती कशी असेल यावर सविस्तर माहिती दिली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डिगंबर महाले यांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य कसे व का हवे आहे? नियोजन समिती व त्याअंतर्गत विविध प्रकारच्या समित्यांची का आवश्यकता आहे याबाबत मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी पत्रकार संजय पाटील, खा.शि.मंडळाच्या उपाध्यक्षा माधुरी पाटील, ज्येष्ठ नेते अनिल शिसोदे, नंदुरबारचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील,विजयसिंग पवार , नगरसेवक प्रवीण पाठक, रणजीत शिंदे, महिला मंडळाच्या अध्यक्षा करुणा सोनार, भटू रंगराव पाटील, आर्किटेक्ट चेतन सोनार , पत्रकार उमेश काटे , प्रा. लीलाधर पाटील, मुख्याध्यापक सतिष देशमुख, खा.शि.मंडळाच्या विश्वस्थ वसुंधरा लांडगे, बाजार समितीचे संचालक उदय पाटील, निवृत्त केंद्रप्रमुख भागवत गुरुजी , ’मसाप’चे अद्यक्ष नरेंद्र निकुंभ यांनी मनोगते व्यक्त केली.