युवा विकास फाउंडेशनतर्फे 162 मधुमेह रुग्णांची तपासणी

0

जळगाव। सिताबाई गणपत भंगाळे माध्यमिक विद्यालय व आप्पासाहेब शिंदे प्राथमिक विद्यामंदीरमध्ये डॉ.स्नेहल फेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा विकास फाऊंडेशन व रिया स्पोर्ट अ‍ॅकॅडमी यांच्यामार्फत मधुमेह तपासणी शिबराचे शुक्रवारी 9 रोजी आयोजन करण्यात आले.

यावेळी 162 मधुमेह रुग्णांची तपासणी करण्यात आली. डॉ.फेगडे यांनी मधूमेहाबाबत घ्यावयाची काळजी व उपचार याविषयी मार्गदर्शन करुन रुग्णांच्या शंका निरसन केले. याप्रसंगी डॉ.किरण पाटील, डॉ.जितेंद्र चौधरी, डॉ.अभिषेक फिरके, डॉ.सुनिल भंगाळे, विष्णु भंगाळे, ललित चौधरी, महेश पाटील, सुरेश अत्तरदे, अजिंक्य देसाई, उमेश पाटील, शाम सटाले, शशांक शिरनामे, सुनिता श्रीरामे, राजेश वारके, हेमंत पाटील, विकी भंगाळे आदी उपस्थिती होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, विजया चौधरी, दिपक भांरबे, विवेक नेहते, दिपनंदा पाटील, सचिन महाजन, स्वाती पगारे यांनी परिश्रम घेतले.