मुंबई : भारतीय क्रिकेट मधील अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण, बीसीसीआयच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. याबद्दल बीसीसीआयने युसूफ पठाणला 5 महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षात युसूफ पठाणने तब्येत बिघडलेली असताना उपचारासाठी काही औषध घेतली होती.
मात्र ही औषधे बीसीसीआयने घालून दिलेल्या नियमांमध्ये बसत नाही. अशा औषधांचे सेवन केल्यास ते उत्तेजक द्रव्यांचे सेवन मानले जाते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार युसूफने हे औषध घेतल्याचे समजते. मात्र हे औषध बीसीसीसीआयच्या नियमांमध्ये बसत नसल्याची कल्पना युसूफला नसल्याची माहिती त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे.