यूपी-बिहार वक्तव्यावरून कमलनाथ यांच्या विरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल

0

भोपाळ-यूपी-बिहारच्या लोकांमुळे मध्य प्रदेशच्या नागरिकांना रोजगार मिळत नसल्याचे वक्तव्य नुकतेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले कमलनाथ यांच्या अंगलट येत असल्याचे दिसत आहे. कारण कमलनाथ यांच्यावर बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

कमलनाथ मात्र त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील कमलनाथ यांच्यावर टीका केली आहे.