येणार्‍या विधानसभेत मीच दांगडो घालणार – खडसे

0

अमळनेर । तालुक्यातील लोणसीम येथे शेतकरी मेळाव्याप्रसंगी बोलतांना खडसे म्हणाले अमळनेर, बोदवड, मुक्ताईनगर या भागातील जनतेचे प्रश्‍न सूटली नाहीत तर येणार्‍या विधानसभेत मीच दांगडो घालणार आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी केले. अमळनेर तालुक्यातील लोणसिम येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आ.खडसे पुढे म्हणाले कि, चाळीस वर्षापासून राजकारणात आहे, जनतेच्या प्रश्‍नांची भूमिका कोण मांडेल, राज्यातील प्रश्‍नांना नाथाभाऊच लागतो. सत्तेसाठी लाचार होणार नाही, आतापर्यंत जे पाय चाटत होते, त्यांची अनेक ’पाप’सुधरावीत म्हणून मी झाकलीत, हे बरसाती मेंढक असून ते हंगामी डराव डराव करतात. राजकारण हे निस्वार्थी भावनेतून केले पाहिजे. नाथाभाऊचा आवाज हा वाघाचा आवाज आहे. नाथाभाऊची नाळ जनतेशी जोडली गेली आहे. मी कुणाचे काही नुकसान केले नाही तरी मला बाजूला का केले? असाही टोला मारत सत्ताधार्‍यांना घरचा आहेर दिला आहे. शेतकरी मेळाव्यात होत असलेल्या अन्यायाबाबत व्यथा मांडत सवाल खडसे यांनी भाषणातून केला.