उस्मानाबाद: राज्य सरकारने शेतकर्यांना खूशखबर दिली आहे. दुधाचे दर वाढवण्यासाठी शेतकर्यांनी केलेल्या संपाला अखेर यश मिळाले आहे. येत्या 3 दिवसांत दुधाचे दर वाढवणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली.
दुधाच्या नव्या दरांनुसार सध्याचा 24 रुपये लीटरने असणारा गाईच्या दुधाचा दर आता 27 रुपयांपर्यंत वाढणार आहे, तर 33 रुपये लीटरने म्हशीच्या दुधाचा असणारा दर आता 37 रुपयांपर्यंत वाढणार आहे. येत्या तीन दिवसांत दुधाचे नवे दर लागू होणार असून, दूध संघांना हे नवे दर दूध उत्पादकांना देणे बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारला शेतकर्यांची काळजी आहे. 13 तारखेला दुधाचे नवे दर घोषित करून, शेतकर्यांना दिलासा देऊ. शेतकर्यांच्या पाठीमागे सरकार उभे राहील, असे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले.