पुणे । आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आपला पाठींबा देणार असल्याचे मत केंद्रिय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मोदी दलितविरोधी, संविधानविरोधी असल्याचा प्रचार काँग्रेस करत आहे. काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाहीत. तसेच येत्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला शंभरचा आकडा पार करता येणार नाही. आठवले यांनी मोदी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे.
27 मे रोजी पुण्यामध्ये राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन एसएसपीएमएस मैदानावर करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिले असल्याचे आठवले यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिवेशनास उपस्थित राहण्याचे निश्चित झाले आहे. याचसोबत राष्ट्रीय अधिवेशनात राज्यातील दलित लेखक, विचारवंत अशा सुमारे 150 जणांना आमंत्रण देण्यात आले आहे.
Next Post